सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना विनंती करण्यात येते की , या कोषागाराचे दि.Wed, Jan 13, 2016 at 11:28 AM रोजीच्या व दि. Fri, Jan 22, 2016 at 5:02 PM रोजीच्या इमेल संदेशानुसार व कोषागाराचे ब्लॉग - www.sindhudurgtreasury.blogspot.in
वर प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी
त्यांचे त्यांचे कार्यालयातील DCPS Missing credit बाबतची परीपूर्ण माहिती व
DCPS 6th pay arrears बाबतची परीपूर्ण माहिती अनुक्रमे दि. 23-01-2016 व
दि.28-01-2016 पूर्वी जिल्हा कोषागारास इमेलव्दारे पाठविणे आवश्यक होते.
त्यानंतरही वारंवार याबाबत मागणी करुनही बरेच कार्यालयांकडून माहिती
उपलब्ध झालेली नाही.
तरी
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना पुन्हा विनंती करण्यात येते की
त्यांनी दि.३0-06-2016 पर्यंत आपलेकडील DCPS Missing credit बाबतची व DCPS
6th pay arrears बाबतची परीपूर्ण माहिती कोषागाराचे ब्लॉगवर उपलब्ध
नमुन्यांमध्ये भरुन जिल्हा कोषागाराला to.sindhudurg@zillamahakosh.in वर पाठवावी. नमुन्यांमध्ये माहिती भरण्यासाठीचा पासवर्ड nps असा आहे. 6th
pay arrears बाबत जरी रक्कम missing असली किंवा नसही तरीही आपणाकडून DCPS
6th pay arrears बाबत ज्या ज्या कर्मचा-यांचे हप्ते जमा केले आहेत
त्या सर्वांची माहिती देणे आवश्यक आहे. दोन्ही प्रकारची
माहिती भरण्याबाबतच्या सूचनांसाठी कृपया खालिल अ.क्र.१ व २ वर क्लिक करावे व त्यामध्ये असलेल्या इमेलच्या प्रतिमधील सूचना विचारात घ्याव्यात. ज्या DDO नी परीपूर्ण माहिती यापूर्वीच सादर केली आहे त्यांनी पुन्हा नव्याने माहिती पाठविण्याची आवश्यकता नाही मात्र् सोबतचे प्रमाणपत्रात माहिती पाठविल्याचा दिनांक नमुद करुन प्रमाणपत्र् दि ३०-०६-२०१६ पर्यंत जिल्हा कोषागारात शिक्का, स्वाक्ष्ारी व नावासह सादर करावे. आता ३०-०६-२०१६ पूर्वी जे DDO माहिती सादर करणार आहेत त्यांनी माहिती सादर केल्यावर लगेचच प्रमाणपत्रावर माहिती पाठविल्याचा दिनांक नमुद करुन प्रमाणपत्र् दि.३०-०६-२०१६ पर्यंत जिल्हा कोषागारात सादर करावे.
त्यानंतर दि.०१-०७-२०१६ पासून DCPS बाबतचे सोबत जोडलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र् स्वाक्षरी करुन जिल्हा कोषागाराकडे पाठविल्याशिवाय आपली कोणतीच देयके जिल्हा कोषागारात तसेच उपकोषागारात स्विकारली जाणार नाहित याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
सोबतच्या नमुन्यामधीलच प्रमाणपत्र प्रींट करुन त्यामध्ाील दोन्ही प्रमाणपत्रांत अ.क्र. १ किंवा २ पैकी लागु असलेला मुद्दा ठेऊन उरलेल्या मुद्यावर काट मारावी व DDO यांचे शिक्का, स्वाक्षरी व नावासह एका प्रतित जिल्हा कोषागारात सादर करावे. सोबतचे नमुन्यात दिल्याप्रमाणे एकाच पृष्ठावर दोन्ही प्रमाणपत्रे सादर करावी. मधून कागद फाडून दोन्ही प्रमाणपत्रे वेगवेगळी करु नये.
खालिल नमुद माहितीसाठी त्यावर क्लीक करावे.
१ - दि.Wed, Jan 13, 2016 at 11:28 AM रोजीच्या इमेलची प्रत
२ - दि. Fri, Jan 22, 2016 at 5:02 PM रोजीच्या इमेलची प्रत.
३ - आज रोजीपर्यंत Missing credit माहिती प्राप्त असलेल्या DDO ची यादी.
४ - आज राेजीपर्यंत DCPS 6th pay arrears बाबत माहिती प्राप्त असलेल्या DDO ची यादी.
५ - सादर करायच्या प्रमाणपत्राचा नमुना.
६ - DCPS Missing credit ची माहिती भरुन पाठविण्यासाठीचा नमुना.
७ - DCPS 6th pay arrears ची माहिती भरुन पाठविण्यासाठीचा नमुना.