सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उपकोषागारांकडील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासनामार्फत अदात्याचे प्रदान थेट त्याचे खात्यामध्ये करणेसाठी CMP ( Cash Management Product ) चा वापर सुरु केला आहे. ज्या उपकोषागारात महाराष्ट्र शासनाचे सर्व व्यवहार State Bank Of India चे शाखेमार्फत केले जातात त्या सर्व उपकोषागार स्तरावर ही प्रणाली लवकरच सुरु होणार आहे. त्यादृष्टीने सर्व आहरण व संवितरण अधिका-यांना दि.13-08-2014 रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणातील सुचनांनुसार सर्वांनी DDO Registration बाबत कार्यवाही पूर्ण करुन ठेवावी ही विनंती. CMP प्रणालीबाबत पुढील सुचना प्राप्त झाल्यावर त्या आपणाला या ब्लॉगव्दारे कळविण्यात येतील.