शासन निर्णय वित्त विभाग क्र.संकीर्ण-2014/प्र.क्र.40/कोषा-प्रशा-4/ दि.19 जुलै 2019 चे शासन निर्णयानुसार वर्ष 2019-20 साठी 01-07-2019 ते 30-06-2020 या कालावधीमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी .
विमा छत्र योजना सन 2019-2020 ही DDO मार्फत राबवावयाची आहे ,फक्त सेवानिवृत्त झालेल्यांबाबत ही कार्यवाही कोषागार कार्यालय मार्फत होणार आहे ,याची कृपया नोंद घ्यावी . त्यासाठी 01-07-2019 ते 30-06-2020 या कालावधीमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट् करणेसाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी ही विनंती.
१) प्रीमिअम ची रक्कम अग्रीमाद्वारे भरावयाची असेल तर प्रथम अग्रीमाची देयके कोषागार कार्यालयात सादर करून ती देयकाची रक्कम संबधित DDO च्या खात्यात ECS द्वारे वर्ग करणे आवश्यक राहील. त्यासाठी ज्या ठिकाणी CMP व्दारे प्रदान होते त्या DDO यांनी अग्रीमाचे देयकाचे BEAMS प्राधिकारपत्र तयार करताना DDO यांना Payee म्हणून निवडून तयार करावे. म्हणजे सदर रक्कम DDO चे खात्यात जमा होईल.
2) धनादेशाद्वारे / धनाकर्षाव्दारे प्रिमिअम ची रक्कम स्वत: भरू इच्छिणाऱ्यांनी प्रीमीअमची रक्कम थेट The new India Assurance co.ltd यांच्या खालिल मुद्दा क्र.3 मध्ये दिलेल्या खात्यावर NEFT व्दारे जमा करावी व त्याबाबतचा अचुक UTR No व Date आपल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कळवावा.
2) धनादेशाद्वारे / धनाकर्षाव्दारे प्रिमिअम ची रक्कम स्वत: भरू इच्छिणाऱ्यांनी प्रीमीअमची रक्कम थेट The new India Assurance co.ltd यांच्या खालिल मुद्दा क्र.3 मध्ये दिलेल्या खात्यावर NEFT व्दारे जमा करावी व त्याबाबतचा अचुक UTR No व Date आपल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कळवावा.
3) DDO नी अग्रीम देयके पारित झाल्यावर संबधित प्राप्त रक्कम The New India Assurance co.ltd च्या खाली नमुद बँक खात्यात ECS /NEFT ने वर्ग करून त्याचा UTR No . प्राप्त करून घ्यायचा . (Note -हा UTR No एकापासून अनेकांचा एकच असू शकतो .)
Account name: - The new India Assurance co.ltd
Axis Bank Account no. - 911020038067076
IFS CODE - UTIB0000230
Address: - Axis Bank ltd,Bandra Kurla complex, Mumbai
4).BEAMS या प्रणाली मध्ये Other notices आणि important links अंतर्गत संबधित कंपनीची url दिली आहे तसेच https://www.mahakosh.gov.in/m/, ( www.mahakosh.gov.in) या संकेतस्थळावरही Useful links मध्ये Vimachatra Yojana नावाने लींक उपलब्ध आहे त्यावर click करून DDO ने नोंदणी ची कार्यवाही पूर्ण करायची आहे . त्यामध्ये माहिती भरणे सोपे व्हावे यासाठी सोबत Swasthya नावाची word फाईल मार्गदर्शक म्हणून उपलब्ध करणेत आली आहे ती मिळण्याासाठी येथे क्लिक करा.
5) DDO login मध्ये आपला ddo code ( 10 अंकी) type करून password च्या जागी पण तोच ddo code वापरावा (पहिल्यांदा login करताना ,त्यानंतर तुम्ही password बदलू शकता )
6).उपरोक्त क्रमांक २ किंवा 3 मधील नमूद UTR no . payment mode मध्ये जाऊन type करावयाचा आहे.
उदा . चार व्यक्तींच्या प्रिमिअम ची रक्कम एकत्र वर्ग केली असेल तर तोच UTR No . त्या चार ही व्यक्तींचा web form भरताना वापरायचा आहे .
7) सर्व कर्मचा-यांचा web form भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येणारी print out काढून ,त्यावर संबधित कर्मचारी /अधिकारी यांचा व त्यांच्या spouse ( पती किंवा पत्नि ) चा फोटो चिकटवून ,संबधित कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घेऊन ती print out ( दोन प्रतित ) जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करावयाची आहे . उपकोषागार स्तरावरील DDO नी सर्व फॉर्म आपल्याकडील उपकोषागारात सादर करावे. कोषागारांनी संबधित print outs ची DDO wise रजिस्टर मध्ये नोंद घेऊन ,त्या MD INDIA च्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करणे आवश्यक राहील .
8) संबधित नूतनीकरणाची प्रक्रिया दिनांक २4 जुलै नंतर 1 महिन्यापर्यंत पूर्ण करावयाची असल्यामुळे सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्रिमिअम च्या अग्रीमाची देयके प्राधान्यक्रमाने कोषागारात / उपकोषागारात सादर करावीत व रक्कम वर अ.क्र.3 मध्ये नमुद खात्यावर वर्ग करुन त्याचा अचुक UTR No व Date प्राप्त करुन घ्यावी. तसेच स्वत: रक्कम भरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रक्कम The new India Assurance co.ltd यांचेकडे वर्ग केल्याबाबतचा अचुक UTR No व Date प्राप्त करुन घ्यावी. त्यानंतर नोंदणी करणाची प्रक्रिया ही याच महिन्यात पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे .
(महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-2014/प्र.क्र.40/ भाग १ /कोषा-प्रशा 4 / दि.19 जुलै 2019 नुसार वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा छत्र योजनेबाबत संवर्गनीहाय विमा छत्र रक्कम व त्यानुसारवार्षिक हप्ता दर्शविणारा तक्ता. ( दि.19-07-2019 पर्यंतचे आदेशांनुसार ) GST सह दर
अधिकारी/कर्मचारी संवर्ग
|
किमान विमा रक्कम
|
ऐच्छिक
| |
विमा रक्कम
|
कमाल विमा रक्कम
| ||
अखिल भारतील सेवेतील अधिकारी व
राज्य शसनाचे गट अ संवर्गातील अधिकारी |
रु.5 लक्ष
|
रु.10 लक्ष
|
रु.20 लक्ष
|
राज्य शासनाचे गट ब
कर्मचारी / अधिकारी |
रु.3 लक्ष
|
रु.4 लक्ष
|
रु.5 लक्ष
|
राज्य शासनाचे गट क कर्मचारी /
अधिकारी |
रु.1 लक्ष
|
रु.2 लक्ष
|
रु.3 लक्ष
|
राज्य शासनाचे गट ड
कर्मचारी |
रु.1 लक्ष
|
रु.2 लक्ष
|
रु.3 लक्ष
|
विमाछत्र रक्क्म ( स्वत: व पती /पत्नी दोघांसाठी )
|
वार्षिक हप्ता रक्कम
|
18% GST सह (in Rs.)
| |
Rs. 100000/-
|
14278
|
Rs. 200000/-
|
20119
|
Rs. 300000/-
|
25960
|
Rs. 400000/-
|
27258
|
Rs. 500000/-
|
32450
|
Rs. 800000/-
|
वगळण्यात येत आहे
|
Rs. 900000/-
|
वगळण्यात येत आहे
|
Rs. 1000000/-
|
71390
|
Rs. 2000000/-
|
129800
|
- या योजनेत सहभागी झालेनंतर वैद्यकीय खर्चाबाबतचे Claim करण्यासठीचा अर्जाचा नमुना TPA यांनी पाठविला आहे तो मिळण्यासाठी येथे क्लिक करा.
- TPA यांनी दि.16-10-2018 रोजीचे प्रशिक्षणादरम्यान दाखविलेले या योजनेबाबतची माहिती आसलेले Presentation मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
- दि.19.07.2019 विमाछत्र योजनेचा शासन निर्णय मिळविण्या करिता येथे क्लिक करा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------